Thursday 11 June 2015

'सम्यक संवाद' बैठक, ९ जून २०१५ चा संक्षिप्त वृत्तांत

ही बैठक TISS येथे संजीव चांदोरकरांच्या कार्यालयात झाली. उल्का महाजन, गौरव तोडकर, संजीव चांदोरकर व सुरेश सावंत या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीतील चर्चेतून पुढे आलेले महत्वाचे मुद्देः
  1. सम्यक संवाद या मंचाने स्वतःची अशी जाहीर भूमिका घेऊ नये. विविध भूमिकांची चर्चा करण्यासाठीचा तो मंच राहावा. 'गांधी मला भेटला' या कवितेच्या वादानिमित्त काही व्यक्तींच्या नावे निवेदन काढण्यात आले. तीच पद्धत अवलंबली जावी. वर्तमान व भविष्यकाळात आपल्याशी जोडल्या जाणाऱ्यांना त्यामुळे मोकळीक राहील. अर्थात, संंविधानातल्या मूल्यांप्रती हा मंच निश्चित बांधील आहे.  
  2. फिल्म क्लबः
    1. हा उपक्रम चालवण्यासाठी सोनाली, गौरव, श्याम, विनोद व नागेश यांची 'फिल्म क्लब संयोजन समिती' करावी. गौरव व सोनाली यांनी त्याच्या समन्वयाची जबाबदारी घ्यावी.
    2. सिनेमा दाखवण्यासाठी महिन्याचा निश्चित दिवस ठरवावा. तो दुसरा  शनिवार असावा.
    3. दरमहिन्याच्या सिनेमाचा खर्च भागविण्यासाठी या वर्षातील खर्चासाठी १० हजार रुपयांचा निधी जमा करावा. १०००, ५००, १०० रुपये ज्याची जशी इच्छा व ऐपत असेल, त्याप्रमाणे जमा करावे. कोणावरही सक्ती करु नये. फिल्म क्लब संयोजन समितीने या रकमेचा हिशेब ठेवून विशिष्ट मुदतीनंतर तो लोकांना जाहीर करावा. तूर्त पावती वगैरेची औपचारिकता करण्याची गरज नाही. (संजीव चांदोरकर यांनी १००० रुपये बैठकीतच दिले. ते सुरेश सावंत यांच्याकडे तूर्त जमा आहेत.)
    4. गेल्या महिन्यात सामना सिनेमा व त्यानिमित्ताने ४० वर्षातील राज्यातील राजकारणातील बदलांची चर्चा या कार्यक्रमाची निश्चिती होऊ शकली नाही. या महिन्यात ती करण्याच्या दृष्टीने उल्का महाजन दत्ता बाळसराफांशी बोलणार आहेत. तदनंतरचा पाठपुरावा फिल्म क्लब समितीने करावा.
  3. नवे उपक्रमः
    1. खळबळ मनातलीः तरुण मंडळींना पडणारे विविध प्रश्न त्यांनी मोकळेपणाने विचारावेत व त्यांची चर्चा व्हावी, यासाठी हा उपक्रम आहे. आपल्याशी संबंधित तरुण मंडळींना (२५-३०) यासाठी निमंत्रित करावे. दादर श्रमिक अथवा अन्य सोयीच्या ठिकाणी २-३ तासांची ही बैठक करावी. संजीव चांदोरकर या बैठकीचे संचालन करतील. त्यांनी यासंबंधीची संकल्पना स्पष्ट करणारे वाटसरुमधील निवेदन स्वतंत्र मेलद्वारे आपल्याला पाठवलेले आहे. सोनाली, गौरव, उमेश यांनी या उपक्रमाची चाचपणी तरुणांत करावी व त्याबाबत संजीव चांदोरकरांशी बोलावे.
    2. संविधान सरनामा जागरणः संविधानाच्या प्रास्ताविकातील मूल्यांचे जागरण महाविद्यालये, शाळा, संघटनांचे कार्यकर्ते तसेच अन्य ठिकाणी करायला हवे. त्यासाठी आपल्यात प्रथम या मूल्यांचा आशय व मांडणी यांची स्पष्टता येणे गरजेचे आहे. ती आणण्यासाठी एक बैठक पनवेलला उल्का महाजन यांच्या घरी गुरुवारी १८  जून २०१५ रोजी सकाळी ९.३० वा. ठेवण्यात आली आहे. बैठक किमान ४ तास चालेल. (डबा आणण्याची गरज नाही. जेवणाची व्यवस्था उल्का महाजन करणार आहेत.) या बैठकीसाठी उल्का, सोनाली, गौरव, सुरेश व उमेश एवढे लोक निश्चित असणार आहेत. इतरांपैकी ज्यांना शक्य असेल त्यांनी त्याप्रमाणे आधी कळवावे. या बैठकीची पहिली मांडणी सुरेश सावंत करणार आहेत. त्यांची यासंबंधातली टिपणे खाली जोडली आहेत.
धन्यवाद.
आपला,
सुरेश सावंत

Wednesday 3 June 2015

आम्ही कवीच्या बाजूचे...

लोकसत्ता, २० मे २०१५ च्या अंकात प्रसिद्ध झालेली ‘गांधी मला भेटला’ या कवितेच्या वादाविषयीची एक भूमिकाः

Posted by सम्यक संवाद - Samyak Sanvad on Tuesday, May 19, 2015

'सम्यक संवाद' फिल्म क्लबतर्फे २३ मे २०१५ रोजी श्रमिक, दादर येथे 'दो बिघा जमीन'

'सम्यक संवाद' फिल्म क्लबतर्फे २३ मे २०१५ रोजी श्रमिक, दादर येथे 'दो बिघा जमीन' हा सिनेमा दाखवला गेला. सिनेमानंतर त्यावर ...

Posted by सम्यक संवाद - Samyak Sanvad on Saturday, May 23, 2015

२९ एप्रिल २०१५, TISS येथील बैठकीतील महत्वाचे मुद्दे व निर्णय

1) वेगवेगळ्या संघटनांत काम करणारे आपण एकत्रितपणे हा एक स्वतंत्र मंच का तयार करत आहोत, आपल्याला काय वेगळे साधायचे आहे तसेच काय वेगळे करायचे आहे, याविषयी बराच खल झाला. ‘जनकेंद्री सामाजिक, राजकीय जाणिवा (खास करुन नव्या पिढीत) जागृत करणे’ हे या मंचाचे ध्येय राहील, या सूचनेला सर्वसाधारण मान्यता मिळाली. ‘जनकेंद्री’चे अधिक नेमके स्पष्टीकरण असलेले शब्द/संकल्पना वापरुन दोन-तीन ओळीत बसेल एवढे एक ‘विधान’ तयार करावे. 
2) तरुण कार्यकर्त्यांचे जाळे विणणे हे मुख्य लक्ष्य राहील. 
3) या प्रक्रियेत सहभागी मंडळींच्या विविध प्रकारच्या व पातळीवरच्या राजकीय धारणा व अपेक्षा असू शकतात. त्या सर्व ‘सम्यक संवाद’ वर लादण्याचा आग्रह राहू नये. किमान सहमतीची भूमिका घ्यायला हवी. ही भूमिका हळू हळू विकसित करावी. 
4) तरुण पिढीचे पुरोगामी चळवळीविषयीचे आजचे आकलन, समजुती, गंड, निरक्षरता लक्षात घेता तिला समजतील, रुचतील अशा प्रकारचे कार्यक्रम व मांडणीची भाषा हवी. तथापि, हे करताना आपल्याला काय साध्य करायचे आहे, याचे भान ढळू देता कामा नये. 
5) संजीव चांदोरकर व सुरेश सावंत यांच्या टिपणातून आलेल्या दिशा व कार्यक्रमांच्या अनुषंगाने अनेक सूचना आल्या. उदा. 1. फिल्म क्लब व आणखी एक असे महिन्यातून किमान २ कार्यक्रम होतील, असे पहावे. 2. सम्यक संवादच्या वेबसाईटवर संकलित मजकुराबरोबरच स्वतंत्र लिखाण टाकले जावे. त्यासाठी तसे लेखक पहावेत. 3. फेसबुक पेज अधिकाधिक Like करण्याची मोहीम करावी. त्यावर जाणीवपूर्वक काही चर्चा सुरु कराव्यात. 4. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जन्मवर्षानिमित्त काही खास कार्यक्रमांची मोहीम घ्यावी. सप्ताह साजरा करावा. त्यातून बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाची विविध अंगे प्रचारली जावीत. रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडणारे खुले पत्र लोकांना समजून सांगावे. वितरित करावे. 5. आपले म्हणणे प्रचारणारे कलापथक-पथनाट्ये बसवावीत. 6. महाविद्यालयांमध्ये-शाळांमध्ये संविधानाच्या सरनाम्यातील मूल्ये समजावून सांगण्याचे कार्यक्रम घ्यावेत. 
6) फिल्म क्लबच्या समन्वयाची जबाबदारी गौरव व सोनाली यांनी घेतली. यावेळची फिल्म २३ मे च्या शनिवारी दाखवावी. ‘सामना’ सिनेमा व त्यावर नंदू माधव, गिरीश कुलकर्णी यांच्यासमवेत महाराष्ट्रातल्या राजकारणातले गेल्या ४० वर्षातले बदल या विषयावर चर्चा असा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करावा. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सहकार्याने असा कार्यक्रम करता येईल का याची दत्ता बाळसराफांशी बोलून चाचपणी करावी. तसे ठरल्यास अधिक लोकांना बोलवावे. दादर श्रमिकलाच करावयाचा असल्यास ३०-३५ पेक्षा अधिक लोक बोलावू नयेत. 
7) पुढची बैठक ८ जून २०१५ रोजी दुपारी ३ वा. टाटा सामाजिक विज्ञान संस्था येथे संजीव चांदोरकर उपलब्ध करतील त्या खोलीत होईल. 
8) दरम्यान, संजीव चांदोरकर व सुरेश सावंत यांच्या टिपणावर अधिक विचार करुन आपल्या सूचना पाठवाव्यात. उद्दिष्टाचे (ध्येय) विधान, संघटनात्मक रचना, आर्थिक व अन्य संसाधने, कार्यक्रम यांविषयीच्या सूचना द्याव्यात. (मला वाटते, या सर्वांची चर्चा ईमेल तसेच Whatsapp गटाद्वारे चालू शकते. बैठकीपर्यंत त्यांना काही निश्चित व्यवहार्य आकार यायला त्यामुळे मदत होईल.) 
9) आता ठरवलेल्या उद्दिष्ट व कार्यकक्षेच्या चौकटीत कोणाला काही कार्यक्रम सुचले व करावेसे वाटले, तर त्यांनी ते जरुर करावेत. इतरांना त्याची माहिती मात्र नक्की द्यावी. 
10) हा एक वेगळा प्रयोग आपण करत आहोत. त्याची स्पष्टता यायला अवधी लागेल. त्यादृष्टीने आपण सगळ्यांनी सजग व क्रियाशीलतेने चर्चेत व कार्यक्रमात सहभाग देणे गरजेचे आहे. 
यावेळी बैठकीला संजीव चांदोरकर, उल्का महाजन, सुनील गजाकोश, उमेश खाडे, महेंद्र रोकडे, गौरव तोडकर, सोनाली शिंदे, सुरेश सावंत, दत्ता बाळसराफ, नागेश जाधव, महेश कांबळे अशा ११ जणांना निमंत्रित केले होते. ज्यांचा आधीच्या प्रक्रियेशी संबंध आहे, जे या संकल्पनेशी स्वतःला अधिक जोडून घेऊ इच्छितात अशांची ही नावे होती. असे लोक अजूनही असू शकतात. तथापि, प्राथमिक तयारीच्या बैठका या Brain storming पद्धतीच्या राहणार असल्याने ही संख्या तूर्त मर्यादित राहणे व तेच लोक बैठकीला असणे गरजेचे आहे. 
यावेळच्या बैठकीला दत्ता, नागेश व महेश उपस्थित राहू शकले नव्हते. पुढच्या ८ जूनच्या बैठकीला हे सगळे अपेक्षित आहेत. अगदी कोणाला असे वाटत असेल की यात काही विशिष्ट नावे असणे गरजेचेच आहे, तर त्यांनी ती नावे whatsapp गटावर टाकावीत, मेल करावीत. ही मेल मी तुम्हा सगळ्यांना पाठवताना to च्या पुढे सगळ्यांचे मेल आयडी असतील. ते तुम्ही तुमच्याकडे सम्यक संवाद असा गट करुन त्यात save करुन ठेवावेत. तसेच reply करताना reply to all क्लिक करावे, म्हणजे सगळ्यांना ती मेल जाईल. 
४ तासांची ही बैठक वर म्हटल्याप्रमाणे वेगळा प्रयोग करत असल्याने चाचपडण्याची राहिली असली तरी उमेद वाढवणारी होती. हा प्रयोग कसा व कितपत पुढे जाणार हे ठाऊक नसले तरी अशा प्रयोगाची आवश्यकता मात्र सगळ्यांनाच पटलेली होती. 
सोनालीने बैठकीची सविस्तर टिपणे घेतली आहेत. अजून काही तपशील कोणाला हवे असल्यास त्या टिपणांत मिळू शकतील. त्या टिपणांच्या आधारे औपचारिक अहवाल सोनालीने करणे, यास वेळ लागला असता म्हणून मी हा संक्षिप्त, सूत्ररुपातला वृत्तांत माझ्या समजानुसार केला आहे. काही महत्वाच्या नोंदी राहून गेल्या असतील अथवा मी केलेली नोंद दुरुस्त करायची असेल, तर ती दुरुस्ती/भर घालून तुम्ही पुन्हा सगळ्यांना हा वृत्तांत पाठवावा.

- सुरेश सावंत

Monday 24 December 2012

प्रकट चिंतनः दिल्‍लीतील बलात्‍काराच्‍या क्रौर्याची परिसीमा गाठणा-या घटनेविषयी


  • या घटनेने अख्‍खा देश हादरला आहेमीही हादरलो आहे.

  • गुन्‍हेगारांना तातडीने व अत्‍यंत कडक शासन व्‍हायला हवे असे मलाही वाटतेतथापि,काहीजण फाशी तर काही जण castration (पुरुषाचे वृषण काढून त्‍याला नपुंसक बनविणेअशा शिक्षांची मागणी करत आहेतत्‍यांविषयी मात्र मनात किंतु आहेत.विचार करतो आहेपण या शिक्षांच्‍या बाजूने मन अजून तयार होत नाहीफास्‍ट ट्रॅक कोर्टात रोज सुनावणी होऊन आताच्‍या कायद्यातील कठोरात कठोर शिक्षा तातडीने व्‍हायला हवीएवढे मात्र निश्चित वाटते.

  • आपली अंतर्गत सुरक्षाकायदा-सुव्‍यवस्‍था संभाव्‍य गुन्‍हेगारांना जबर धाक वाटावी,अशी नाहीही वस्‍तुस्थिती आहेयादृष्‍टीने पोलिस यंत्रणेत आवश्‍यक त्‍या सुधारणा तातडीने होणे गरजेचे आहेत्‍याविषयी अनेक सूचना येऊ लागल्‍या आहेतत्‍यांचा गांभीर्याने विचार व्‍हायला हवा.

  • एक लक्षात घ्‍यायला हवे असे वाटतेअशा सुधारणा करुन पोलिस यंत्रणा कितीही परिणामकारक केलीतरी त्‍यास मर्यादा राहणारचअशा गुन्‍ह्यांबाबत नागरिकांनी सजग राहूनवेळेवर हस्‍तक्षेप करणेही गरजेचे आहेदादरला पत्‍नी समजून ज्‍याने दुस-याच मुलीवर कोयत्‍याने वार केलेत्‍याला लोकांनी तिथल्‍या तिथे पकडून पोलिसांच्‍या स्‍वाधीन केलेहे यादृष्‍टीने खूप आश्‍वासक आहे.

  • दिल्‍लीच्‍या या घटनेबाबत ज्‍या प्रतिक्रिया व्‍यक्‍त झाल्‍यात्‍यात बॉलिवूडमधील अनेकांनी कठोर शिक्षांची मागणी केली आहेतथापित्‍यांच्‍यापैकीच एकअनुराग कश्‍यप यांनी आपल्‍या बिरादरीला आत्‍मचिंतन करायला लावले आहेत्‍यांनी स्‍त्रीकडे भोगवस्‍तू म्‍हणूनच पाहायला शिकवणा-या 'तू चिज बडी है मस्‍त मस्‍तसारख्‍या'आयटम सॉंगकडे लक्ष वेधले आहेमला हे खूप महत्‍वाचे वाटतेगणपतीआंबेडकर जयंती इअनेक सार्वजनिक उत्‍सवांच्‍या वेळीअगदी शाळा-कॉलेजांतील गॅदरिंगला,टीव्‍हीवरच्‍या नृत्‍यस्‍पर्धांवेळी या प्रकारच्‍या गाण्‍यांना खास मागणी आपल्‍याकडूनच असतेआपल्‍या मुलींना-अगदी न कळत्‍या मुलींनाही आपण हीच गाणी शिकवून नाचायला लावतोत्‍यांना लोकांनी शिट्याटाळया वाजवल्‍या की आपण पालक कृतार्थ होत असतोमुलींच्‍या 'वस्‍तूकरणातआपण हा जो क्रियाशील सहभाग घेत असतो,त्‍याचे काय करायचे ?

  • मुंबईसारख्‍या शहरांत नवरात्रातले टिप-यांच्‍या तालावर चढत जाणारे दांडिया नृत्‍य आता मोकळ्या मैदानावर दिसणे बंद झाले आहेआधी गणपती पडद्यात बंद झाले आणि नंतर दांडियागणपतीचे बाहेरुन दर्शन आता घेता येत नाहीतथापिरांग लावून बिनपैश्‍याने त्‍यास अजूनही बघता येतेदांडियाला मात्र ब-यापैकी पैसे मोजल्‍याशिवाय जाता येत नाहीया दांडियात आता निखळ मूळ गुजराती लोकसंगीत नसतेत्‍याचे बॉलिवूडी गाण्‍यांशी फ्यूजन केले जातेही गाणी 'तू चिज...' सारखीच असतातहल्‍ली नवरात्रानंतर अविवाहित तरुण मुलींच्‍या गर्भपाताच्‍या घटना वाढल्‍याचे वृत्‍तांत आहेत.

  • आपल्‍या गणपतीनवरात्रदहीहंडीहोळीसारख्‍या सणांचे हे बाजारीकरण आम्‍ही मुकाटपणे नव्‍हेसहर्ष स्‍वीकारले यास जबाबदार कोण ?

  • सध्‍याच्‍या आर्थिक व्‍यवस्‍थेने भौतिक विकास नक्‍की साधला आहेपण तो आजही विषम व असंतुलित आहेत्‍यागाचीसाधेपणाची महती गाणारा पूर्वीचा मध्‍यमवर्ग आज विलक्षण गतीने अर्थसंपन्‍न झाला आहेगरजेपेक्षाही प्रतिष्‍ठेसाठी तो गाड्या,मोबाईल बदलतोराहण्‍यापेक्षाही गुंतवणूक म्‍हणून घरे घेतोप्रसंगी भाड्याने न देता रिकामी ठेवतोसोसायटीत राहणा-यांची ही सुबत्‍ता आणि त्‍या सोसायटीची रखवाली करणा-या सिक्‍युरिटी गार्डला जेमतेम ते हजार रुपये महिन्‍याचा पगार.सोसायटीतल्‍यांची साधनसंपदा तो रोज बघत असतोअर्ध्‍याअधु-या तंग कपड्यातल्‍या मुली-बाया त्‍याच्‍या समोरुन सतत जात येत असतातया स्थितीत त्‍याच्‍या मनात काय चालत असेल त्‍याचे गावतिथली गरिबीतिथल्‍या मुलीतिथली वंचना आणि इथे...? - अशा या विषमतेचे काय करायचे वॉचमनट्रक-शाळा-कंपन्‍यांचे ड्रायव्‍हर-क्लिनरसफाई कामगार असलेल्‍या या मंडळींनी अशा विषमतेत मन मात्र'सं‍तुलितठेवायचे अशी अपेक्षा बहुधा आपण करतो आहोत.

  • मध्‍यम-उच्‍च मध्‍यमवर्गातले तरी 'संतुलितमनाचे आहेत का नाहीतराहू शकत नाहीतस्‍पर्धेच्‍याप्रतिष्‍ठेच्‍याप्रगतीच्‍यासुखाच्‍यामनोरंजनाच्‍या 'चकव्‍यामापदंडांचे तेही बळी आहेत.

  • म्‍हणूनचविषमतेच्‍या या सर्व थरांत विकृती जन्‍मास येतातत्‍या गुन्‍ह्यांना जन्‍म देतात.

  • ज्‍या सुविधा आपल्‍याला आहेतत्‍या सर्व समाजाला मिळायला हव्‍यातयासाठी मी प्रयत्‍न करायला हवाजो सन्‍मानसामाजिक स्‍थान मला आहेते प्रत्‍येक व्‍यक्‍तीला मिळायला हवे यासाठी माझी खटपट राहीलसत्‍ता-प्रतिष्‍ठा-पैसा या मागे दमछाक होईपर्यंत धावण्‍याला लगाम घालून मोकळ्या आकाशाकडेअथांग समुद्राकडे पाहण्‍यास,माणसांत रमण्‍यास वेळ काढेनकातडीपेक्षा मनाच्‍या सौंदर्याचा वेध घेईनवाद्यांच्‍या कर्कश्‍य गोंगाटाऐवजी संगीताचा मधूर सूर ओळखायला लागेन. रंगांच्‍या-आकारांच्‍या-कसरतींच्‍या चमत्‍कृतींतील निरर्थकता समजून घेऊन ख-या कलेचा आस्‍वाद घेईन.

  • ...आजच्‍या विकृतींनापर्यायाने गुन्‍ह्यांना उतार मिळण्‍याचा हा सरळ साधा मार्ग आहे.

    सुरेश सावंत
    20 डिसेंबर 12

Thursday 1 March 2012

'सम्‍यक संवाद' संबंधीचा संजीव चांदोरकर यांचा वाटसरुमधील लेख

'सम्‍यक संवाद' संबंधीचा संजीव चांदोरकर यांचा वाटसरुमधील लेख वाचण्‍यासाठी येथे क्लिक करा.

औरंगाबाद बैठकीची सोनाली शिंदे यांनी घेतलेली टिपणे


वाचण्यापूर्वी....                                                                                                                                                                                                                                                                                                                -हा एक प्रयत्न आहे.
-हे लिखाण अधिक-अनौपचारिक आहे.
-चर्चेतील शब्द तसेच्या तसे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
-नंतर विषयाची चांगली  लिंक लागल्याने नंतरचे लिखाण  हे सुरुवातीपेक्षा अधिक योग्य/बरोबर असेल (तात्पर्य -सुरुवातीच्या लिखाणावरून पूर्ण मांडणीची पद्धत/मुद्द्याबद्दलचे मत ठरवू नये.)
-ठळक केलेले काही शब्द नीट टाईप होऊ शकले नाहीत . 
-व्याकरणाच्या चुका असण्याची दाट शक्यता आहे.
-तरी,माझ्यावर विश्वास ठेवून,मला हे  टिपून घेण्याची सक्ती केल्याबाबत आभारी आहे.
-चांगली/वाईट प्रतिक्रिया द्यावी,अर्थातच पूर्ण लिखाण वाचून.
                                                                               .
                                                                                                            

                                                                                                                  परिवर्तनवादी चळवळीपुढील आव्हाने व पेच.
                                                                                                                                विचार विनिमय बैठक.
                                                                                                                                   ७ जानेवारी २०१२
                                                                                                                        स्थळ -कॉ.डी.व्हि.देशपांडे सभागृह
                                                                                                                                      औरंगाबाद.

अंदाजे सकाळी पावणेअकरा वाजता बैठकीला सुरुवात झाली.सुरेश सावंत यांनी प्रास्ताविक मांडले.

सुरेश सावंत (प्रास्ताविक)-
·  विविध उपक्रम चालू असतात .पुरोगामी  लोकांची विविध आघाड्यांवर भेट होत असते.मोर्चे संपल्यावर चाचा पीत पीत चर्चा होत असते की-आपली व्यापक एकजूट का होत  नाही?त्यामुळे आपला(कामाचा,मोर्चांचा) प्रभाव पडत नाही.एकीकडे संघटना,एन.जी.ओ.वाढत आहेत,पण तेवढ्या प्रमाणात परिणाम दिसत नाही.आमची पिढी -आम्हाला   युक्रांत,मागोवा प्यांथर यांच्या खुणा दिसत होत्या.त्याचा वारसा आम्ही चालवतो,त्याची माहीती आम्हाला आहे.पण त्यात आमचा प्रत्यक्ष सहभाग नाही.त्याची सूत्रे आम्हाला माहिती आहेत.अशी आमची पीढी.या वारस्याच पुढे काय होणार/असा प्रश्न पडतो.म्हणून अशा प्रकारे अनौपचारीकतेत बैठक होणे  गरजेचे आहे ,असे वाटले.मग ही बैठक कोणी बोलवायची ?कोणत्याही एका संघटनेने ही बोलवायची नाही,असे वाटले.म्हणून ही "वैयक्तिक"बैठक आहे. मग माणगावला बैठक झाली. नव्वद लोकांशी बोललो,पन्नास लोकांनी निश्चितता कळवली,चाळीस लोक आले.पन्नासीच्या वर वय असणे निरीक्षक अववेत असे ठरले.बैठक झाली.त्या बैठकीत अशा सूचना आली की विदर्भ,मराठवाडा यांच्यासाठी वेगळी बैठक घ्यावी.                                                    
·  या बैठकीची दोन सूत्रे आहेत. राजकीय हस्तक्षेपाची ताकद आहे किंवा नाही?आणि का(कारणे)?दुसरे सूत्र असे आहे की, व्यापक एकजूट का होत नाही? सांस्कृतिक संघटनांत काय दिसतं?आपापल्या संघटना,राजकीय पक्ष ,सांस्कृतिक संघटना यांच काय चित्र आहे?                                                                                                                                                                            
·  या बैठकीचे उपमुद्दे असे आहेत की,१.राजकीय हस्तक्षेप  २.पुर्गामी एकजुटीची आव्हाने.३.सैद्धांतिक विचारधारा तपासायची गरज आहे का? ४.वर्गीय जाणीव दिसतं आहेत का?का?कसे?                                                                                                                              
मागील बैठकीचा अहवाल मांडला.(याची जोडणी मी या मेलबरोबर करत आहे).       


                                                                                                                                                                                                                                                                                                   
उल्का महाजन-(१२.१५)-
·  राजकीय हस्त्क्षेपात कुठे कमी ,याच चिंतन .मात करण्याची प्रक्रिया कशी सुरु करायची.       
·  " एका प्रक्रियेची उणीव आहे-वारसा पुढे देण्याची पद्धत काय?हे ठरवणे गरजेचे आहे.म्हणून 'विचार वेध'सारखं  व्यासपीठ बांधणे गरजेच आहे"-एन.डी.पाटील.          
·  खुल्या सभा,स्टेजवरील मंडळीला मर्यादा असतात.म्हणून ही चिंतन बठक. म्हणून आम्ही पहिल्या पत्रकात हा मुद्दा नमूद केला होता कि,चुका न काढता "भूतकाळाचे आकलन व भविष्यातील दिशा" याची काळजी घ्यावी.अभिनिवेष नको.चर्चेत उत्तर शोधण्याची दृष्टी असावी.                                                                                                                                                                                                                                                                             
शांताराम पंदेरे-(१२.३०)-
·  अशा प्रयत्नांकडे सकारात्मक पणे बघितलं पाहिजे.राजकीय पक्षाला जन्म घालणे,सगळ्या समूहाने एकत्र येऊन राजकीय शक्ती  तयार करणे असा प्रयत्न गेल्या दशकात झाला.            
·  इथल्या शोषितांना केंद्रस्थानी ठेवून राजकीय पर्याय उभारणे याचे दोन अर्थ होतात-१.राजकीय पक्ष  २.सामाजिक,संस्क्रुतील,राजकीय ताकद निर्माण करणारी चळवळ
·  छोट्याछोट्या वस्तीतल्या लोकांच्या खऱ्या प्रश्नावर - ते आजची संघर्ष - स्टेटिक .काही मुद्दे भीषण आहेत त्याला सार्वत्रिक व्यापक स्वरूप येऊ शकत.या सर्वांना राजकीय पक्षात आणण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करतात.ते गैर नाही.ते काहीही असो-नाव वेगवेगळी   महाराष्ट्रात परिवर्तनवादी शक्ती याला कमी पडतात.विचार,मुद्दा ,कार्यक्रम,नेतृत्त्व या भोवतीच संघटन,चळवळ,त्याची प्रक्रिया,त्याची साधनसंपत्ती याचा राजकीय परिणाम.-१.ताब्यात घेणे  २.सत्ता दबावाने वाकवणे.   
·  स्वातंत्र्यानंतर  संयुक्त महाराष्ट्र चळवळ ,.......भ्रष्टाचार,समूहांवरचे अत्याचार ,
·  स्त्री अत्याचार इ, प्रश्न राजकीय ताकद निर्माण करू शकलो असतो.जस पाहिले काँग्रेस इतर सरकार (भाजप-सेना)यांच सरकार.
·  एकपक्षीय राजवट जाऊन बहुपक्षीय राजवट
·  आस्तित्व ,वास्तव यांच्याकडे आपण कसे पाहणार.त्या नेहमीच जनविरोधी,लोकशाहीविरोधी मानल्या गेल्या.
·  आज सर्वच पक्ष सत्ताधारी बनून अनुभव घेतलेले आहेत.सत्ता कशी चालते,डायनामिक्स ,त्याचा संघर्ष सगळ्यांना माहीत आहे. ' ..... बहुजन संघर्ष' यांच्याकडे ताकद हे महत्वाच आहे.
·  एन. जी.ओ.,महिला,दलित,भटके,आदि.
·  आताच्या माध्यम वर्गीयांकडे पाहण्याची दृष्टी निश्चित करणे.
          १.बदलाची प्रक्रिया समजून घेण्याची मर्यादा
          २.'बहुजन संघर्ष' व्यापक स्वीकृती दिसत नाही.
          ३.महत्त्वाच्या मुद्द्यांकडे,प्रश्नांकडे दुर्लक्ष.
          ४.राजकीय पर्याय देण्याची महत्त्वाकांक्षा कोणाची?-पक्ष,संघटना,कार्यकर्ते.
          ५.राजकीय चर्चा कशी उभी राहील- १).......
                                                        २)परस्पर संवाद
.                                                       ३)बिगर राजकीय गटांची शक्ती उभारणे
                                                       .४)यांच्यात एकजुटीचे कार्यक्रम 
                                                        ५)सत्ता व आपले संबंध 
                                                        ६)विविध राजकीय पक्षांत संवाद
                                                        ७)कॉंगेस-भाजप केंद्रित राजकीय शक्ती की यांना वगळून राजकीय शक्ती.

डॉ.कानगो -
·  १९७६-७७ साली अशी बैठक झाली असती तर कसले मुद्दे आले असते.
          पहिली चर्चा १)सत्ता ताब्यात कशी २)वर्ण व जात यांचा समन्वय ३)भारत हा खरा स्वतंत्र  की साम्राज्यवाद्यांचा की त्यांच्यासकट इतरांचा 
·  जनतेच्या चळवळी थंड झाल्यात का?-नाही
·  ८० नंतर चळवळी-anti-state.जितक ओपन असायचं तितक आता नाही.सत्तेमार्फत बदल-"Good Governance".अराजकीयकरणामुळे एन.जी.ओ.
·  तिसरा फ्रंट.चर्चा दोनच.काँग्रेस आणि बीजेपी टाळून काही करता येऊ शकत.पक्षाला टाळण नाही.विचारसरणीचा भाग.मग तिसरी कोणती.
·  ७७ साली झालं असतं-सामान्यतः कम्युनिस्ट पक्षात काय बदल झाले पाहिजेत.
·    बँकांच्या राष्ट्रीयकरणानंतर आम्ही चर्चा---चळवळ करत करत सगळ्याच राष्ट्रीयकरण झाले तर काय होईल---कारण डावी चळवळ जगभरात मजबूत(strong) होती.  
·  आता "डावा"  हा पर्याय लोकांपुढे.
·  ......म्हणून या चर्चेची गरज व मी स्वागत करतो.  
             १."राजकारणाला मध्यवर्ती कस आणता येईल"  हा माझा कळीचा मुद्दा.
             २.जुने प्रश्न-कशाला प्राधान्य -आर्थिक प्रश्नावर भर की सामाजिक-सांस्कृतिक प्रश्नावर भर
             ३.नवीन प्रश्न-विकासाला कस बघावं
·  एकांगी विचार-गांधीवादी,खाजगीकरण
              भारतासारख्या १२० कोटीच्या देशात-जगाबरोबर काही बदल होणारच-शहरीकरण,शेतीतील संख्या कमी होणारच.
              शेतीवरचा भार कमी पण त्यांना रोजगार(empt .) मिळत नाही.
               भारत-Industrial Model Of Development  उपयोगी पडेल का?पर्याय कसा तयार होईल?गांधीजी-ग्राम्स्वराज त्या मार्गाने जाता येणार नाही कारण लोकांना काय पाहिजे हे बघितलं पाहिजे.उदा.बोनस मागू नका हे लोक ऐकणार                                                  नाहीत ,परवाची बातमी-औरंगाबाद-Manufacturing Zone -...कोटी रोजगार उपलब्ध करून देत आहे.
·  शेत जाते म्हणून लोक चळवळीत उभे राहतात,पण रोजगार जाईल म्हणून उभे राहात नाही.अपवाद-सेझ.
·  लोक पूनर्वसन(Rehabilitation) अधिक  हव म्हणून आंदोलन करतात.
·   "विकासा"च्या मॉडेल वर "सहमतीचा" मुद्दा.
·  'सत्ता उजवीकडे सरकली आहे' म्हणून धोका जाणवतो का?कारण आर्थिक संकट येते.जर डाव्या चळवळी कमी तेव्हा धोका.उदा.१९३२ चा अनुभव....... त्यामुळे  'अराजकीयता '.जी विकासाच्या दृष्टीने वाईट.तेच (अराजकीयता वाढणे) भ्रष्टाचार आंदोलनात दिसलं.

उल्का महाजन-
आम्हाला जे दिसतंय.जे बदल कानगोंनी मांडले.
·  विकासाबद्दलची धारणा व तेव्हाचे प्रश्न.
·  Manufacturing Zone खाली येणारी धोरणे- सेझ वर आपली स्पष्ट भूमिका---त्या प्रकारच्या धोरणालाच आपण नाकारतोय.फक्त शेतीसाठी नाही.
·  तीन अन्य पॉलिसी-१.National  Manufacturing Zone ........२.PCPIR -कमीत कमी २०० चौ.कि.मी...३.Delhi -Mumbai Industry Coridor -Eastern & Western .Eastern (तिकडून इकडे येणारा ) & Western (इकडून तिकडे जाणारा).                                                                                          
           -सेझ च्याच तत्वावरच या पॉलीसीही -१.......२.Special Purpose Vehicle  3.विकासाचे अधिकार व इतर अधिकार त्यांच्याकडेच .                                                                                                                                                                                                                                                           लो        -लोकशाहीला जो हात घातला जातोय आणि त्यासाठी येणारा जमिनीसंपादनाचा मुद्दा हा जास्त जमिनीबाबत आहे.सिंचित जमिनीवरचे हे उपक्रम आहेत..
·  विकासाची नवी मांडणी-"औद्योगिकीकरण हवे पण ते या तत्त्वावर  नाही."
·  Manufacturing Zone -शब्दशः बजाज एलियांस ने रचलेली आहे.ती योजना वाचताना लक्षात येते, की "ती ड्राफ्ट कोण करतंय"......लोकशाही व्यवस्था ,संविधान...                                                                                                                                                                                      मग असा प्रश्न येतो की हे तुकड्यातुकड्यात स्वीकारायच की धोरणच नाकारायच.?  
·  परिवर्तनाचा वाहक वर्ग आज कितीतरी बदललाय .आताचा परिवर्तनाचा वाहक वर्ग कोण?हे शोधण गरजेच आहे.                                                                                                                                                                                                                                                डाव्यांनी कामगार, शेती व संबंधित यांचे संघटन करणे गरजेचे आहे.मग असं का होत नाही?
·  राजकीय हस्तक्षेप करण्यासाठी निवडलेल्या प्रश्नांची निवड ..
श्री.मंगल धारवाडकर 
Manufacturing Industry ला पाणी मिळेल का नाही? हा प्रश्न.ग्राउंड वोटर संपून जाईल.

कॉ.बनसोडे-
·  राजकीय एकजूट करावी हा प्रयत्न सकारात्मक पणे घेतला पाहिजे.पण तरीही ही गोष्ट सोपी नाही.कारण हा पहिला प्रयत्न नाही.पाठच्या प्रयत्नांचे अनुभव पुढे त्याला निवडणुकीचे वळण.त्यामुळे ते टिकलं नाही.पण प्रयत्न तसा झाला.
·  माझ्यापुढे प्रश्न - राजकीय एकजूट करायची म्हणजे नेमक काय करायचं ?त्याच संघटनात्मक स्वरूप काय राहणार आहे-पक्ष की...?--- हेतू काय?
·  काही मुद्द्यांच्या बाबतीत आपण एकजूट आहोत.अजिबातच नाही असं नाही.इतकी निराशाजनक परिस्थिती नाही.                                                                                                                                                                                                                                                                                 परिवर्तनवादी कार्यकर्त्यांत निराशाजनक वातावरण येऊ नये,ही काळजी घेणे गरजेचे आहे.                                                                                                                                                                                                                                                                                                  उदा.आण्णा आंदोलन.-मतभेद पण भ्रष्टाचार जायला पाहिजे यावर एकमत.असेही काही कायदे होऊन गेले जे लोकांना माहीतच नाही.
·  पण ९१ नंतरचा जो काळ होता.ज्यातून कामगार 'बचावात्मक भूमिकेकडे'आता त्यातून बाहेर आलो आहोत.उदा.कामगार-राजेंद्र दर्द,चंद्रकांत यांच्याकडे गेले,आमच्याकडे(संघटनेकडे) का आले नाहीत?                                                                                                                                                      लोक व्यावहारिक आहेत ,त्यात चुकीच नाही.
·  लोकांची विचार करण्याची पद्धत व आपली पद्धत यावर विचार करायला पाहिजे.
·  विकास-     
              विकास व्हायला पाहिजे उदा.आता लोक विरोध करत आहेत.पण जेव्हा जायकवाडी,एमआयडीसी यांना जमिनी दिल्या  तेव्हा लोकांनी विरिध केला नाही.पण लोकांना आता समजतंय  की , 'कोणाचा  विकास झाला.'
              आता लोक विकासाबाबत स्वतचा  विचार करतात की ,माझा विकास होणार असेल...
·  मधल्या काळात बचावात्मक परिस्थिती (आंदोलन नाही ) होती,ती फेज (टप्पा )आपण पार केला आहे.
·  पुढे  जाऊन लोक जागरूक होतील,पण आपण डावे प्रबळ पाहिजेत.
·  संघटीत कामगारसुद्धा असंघटीत......उदा.उस कामगार,गिरणी कामगार ......यांनी इथला  संघटनेचा अनुभव त्यांच्या गावात वापरला पाहिजे.                                                                                                                                                                                                                      पण याच्यात "कामगार(औद्योगिक) वर्ग"च   पुढे राहील.यांना आपण कशी मदत करू शकू,हे बघितलं पाहिजे.
·  'कोणतीच विचारसरणी नको' हीसुद्धा एक विचारसरणीच आहे.ती घातक आहे.साम्राज्यवादी-भांडवलशाहीवादी  आहे.                                                                                                                                                         - मार्क्सवाद पोथी नाही.त्यात भर घातली आहे.लेनिननेही त्यात भर घातली आहे.मार्क्स वादात वैचारिक भर घालणाऱ्यांच स्वागत आहे.(प्रत्यक्ष तसं वागणारे,गाड्यांमधून फिरणारे नाहीत. )                                                                             - एकजुटीत राहिलं पाहिजे हे मान्य आहे.पण ज्याच्याबरोबर व्हायला पाहिजे त्याच्याबरोबर होत नाही.पण आपण प्रयत्न केले पाहिजेत.थोडाफार अभिनिवेश येतो. पण आपण प्रयत्न केले पाहिजे.                                                       - नवीन तंत्रज्ञान वापरता आलं पाहिजे.उदा.फेसबुक,मोबाईल,कॉमप्युटर .चळवळीच्या दृष्टीने त्याचा उपयोग केला पाहिजे. कॉमप्युटरला आपला विरोध पण कामगारांबाबत आपली भूमिका काय-टर कामाचे तर तास कमी करा.             - आधुनिकीकरण झाले पाहिजे,पण त्याचा फायदा कामगारालाही झाला पाहिजे.                                                                                                                                                                                                                            ....नाहीतर आपल्याला मागे यावे लागेल.     
                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                      अड.विष्णू ढोबळे-       
·                                                                                                                                                                                                                                                                                                               विद्रोही साहित्य संमेलनामुळे आपण एकत्र भेटतो .हे अजून बळकट केले पाहिजे.  
·   विदर्भ-सीपीआय च्या पुढाकाराने आण्णाभाऊ साठे परिषद झाली.
         -तात्पर्य-सांस्कृतिक क्षेत्रात जाणीवपूर्वक जायला पाहिजे.जे मार्क्सवादी,त्यापाठोपाठ समाजवादी गेल्या ३०-४० वर्षापासून करत आहेत.                                                                                                 
·  आपलं राजकारण  कधी नव्हे ते एवढ्या संकटात(crisis) मध्ये आलं आहे.                                     
·  लोकशाही राज्य (Democratic state) - माझ्या समजुतीप्रमाणे स्वतःची आर्मी किंवा सेमी आर्मी ......नावाखाली त्यांच्याच लोकांच्या विरोधात वापरते.                            
·  आम्ही युक्रांत मध्ये "स्टेट" चा सर्वात अधिक विचार केला कारण ते कलाल नाही की डावपेच पुढे येत नाहीत .            
·  शेवटी आपण राजकारण हीच किल्ली मानतो.
·  आपण मानणारे की समाजवादी इ.ची गराज.पार्टिशन प्रमाणे हस्तांतरण.          
·  रुलिंग क्लास ला बाधा येईल अशी कोणतीही गोष्ट सत्ताधारी करत नाही. 
·  भ्रष्टाचारच आंदोलन लीगल सिस्टमला सगळ्यात मोठा छेद आहे.                    
·  ज्यांच्या हातात हात देण आम्ही टाळतो,माणूस म्हणूनही आम्ही ज्यांच्यात जात नाही.उदा.सेना,आर.एस.एस.इत्यादीत आमची लोकं जातात.                     
              त्यामुळे आपल्यात कर्मठपणा नसेल तर  फुले आंबेडकर वाद संपेल.               
·  लोकं नेहमीच बरोबर असतात,हे चुकीचे आहे.मग आपण काम लोकांच विवेचन (interpretation) .आणि हे जत्रेत जाऊन  interpretation  नाही होणार .     
·   " परिवर्तनासाठी " महाराष्ट्र भारतातील एकमेव व्यासपीठ".आपल्यातीलच आदर्श व्यक्ती असे म्हणतात की,भारतातील लोकं प्रजा होती आता नागरिक झाली.इतकं सोप्या पद्धतीने interprete करू नये.
·  कितीही confidence वाटत असला तरीही परीस्थिती नाजुक आहे.             
·  समस्या (प्रोब्लेम) आहेत ,मार्क्सवादात तर  आंतरराष्ट्रीय समस्या (प्रोब्लेम) आहेत.             
·  भौगोलिक असमतोल (Regional Imbalance )-विदर्भ-अविकसित,मराठवाडा-३७१-(२) घेऊनही प्रश्नच ,कोकण-.....अशा (जिथे ८० टक्के पाणी जात,एकूण उत्पन्नापैकी खर्च जातो ) गमतीशीर त्र्याक  मध्ये आपल्याला प्रयोग करायचे आहेत. 
·  दोन प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे.    १.ही परिस्थिती समजवाद व मार्क्सवादी यांच्यात का?---नक्षलवादी टोकाची भूमिका---डायरेक्ट स्पोंसर्ड---हा फोरेन फोर्सेस (आंतर राष्ट्रीय शक्ती) मार्फत पसरतोय---हा टोकदार मार्क्सवादाला  डीमोरलाइस्ड (Demoralised) करतो.
·  नवीन मुलं नवीन विचार करतील.
·  आपण एन जी ओ ग्रस्त आहोत.ते माझ्याबरोबर बोलता ,त्यांच्या युरोपातील टूरकडे असते.
·  ते जरी   एन जी ओ  डायरेक्ट  चालवत नसले तरी त्यांच्या विचारशक्तीचा ताबा  एन जी ओ ने घेतलेला असतो .
·  पर्यायी राजकारण विकसित का होत नाही?-फक्त भांडवलशाही नाही.मी स्पष्ट (क्लीअर)नाही.जे मी ८०/९० साली होतो.                           
·   पैशाचं(एन जी  )उंची ताकद वाढेल.निवडून याल,(असे)आपलेच मित्र आहेत.पण परिवर्तनवादी राजकारण नाही होणार.                                                                                  
·  म्हणून मोकळी-ढाकळी चर्चा.बरेच दिवस ते बोललेच नाहीत.                                        
·  चर्चा पाहिजे- कार्यकर्त्यांचे भ्रम जातील.                                        
·  फुले, आंबेडकर,मार्क्सवाद,लेनिन हे बोलायला सोप आहे,पण वागायला अवघड.         
·  हे मार्क्सवादामुळे टिकून होत,मी असं मानत नाही.ते संविधानिक कायद्यामुळे (Constitute Law) टिकलं.                           
                                                                                                                 २-२.५०(जेवण)          
                 
 कॉ.कानगो-  
·  आपण   "महाराष्ट्र राज्य"  आणि त्याची सामाजिक,राजकीय,भौगोलिक परिस्थिती लक्षात घेवुन चर्चा करू.  याचा अर्थ आंतरराष्ट्रीय संदर्भ/Link महत्वाचे नाहीत असा  नाही.यामुळे आपल्याला कमी वेळात जास्त आउटपुट मिळेल.                  
·  परिषदेचा अनुभव-    १.काही गोष्टी (issue) -एकमत-संघर्ष       
                                        यामुळे येणाऱ्या निवडणुकीत पर्यायी मागण्या उभ्या राहतात.उदा.घर-हा गिरणी कामगारांचा प्रश्न नाही.---सिडको ने परवडणारी घरे बांधणे इ. 
                                      २.असंघटीत कामगारांना कस एकत्रित कराव :-मरेपर्यंत पेन्शन,शेतकरी,अंगणवाडी,कोतवाल इ. ना पेन्शन                       
                                                या मुद्द्यांवर आपण मोर्चा काढून दबाव निर्माण करू शकतो.                                   
·  महाराष्ट्र समतोल विकास-पण अडचणी विदर्भ इ.   ते भांडवलशाही डोळ्यासमोर ठेवूनच मागण्या.उदा.आमच्याकडे कारखाने निघाले पाहिजेत इ.-हे सगळंच अयोग्य असं नाही.            
·  मानवी विकासाचा निर्देशांक-बजेट बनवताना गृहीत धरलं पाहिजे.पीडीएस मधील भ्रष्टाचार दूर करण्याचा"विकेंद्रीकरण " हा एक पर्याय.ज्वारी व इतर धान्यांचाही समावेश.                                                                                                              
·  गंभीर मुद्दा-'रोजगार हमी योजना'  दुष्काळामुळे आली.कामगारांनी त्याच्या टक्स मधून पैसे /   टक्स घेण्यासाठी सुचवले.जो  सरकारने दुसरीकडे वळवला.जेव्हा ग्रामीण भागात  लोकं मागण्या की'रोजगार द्या ' ,तेव्हा सरकार म्हणत की आमच्याकडे पैसा  नाही.त्यांना जाणीव करून दीली पाहिजे की हा आमचा पैसा-आंदोलनामार्फत.         
·  लोकांना पक्षामार्फत आव्हान करण्यापेक्षा संघर्ष/चळवळी/मोर्चा साठी आव्हान .जे आले ते आपले.                                

उल्का म.-
·   -त्यात हे मुद्दे जोडले पाहिजे. 
               १)भू-सुधारणा कायद्यांची अंमलबजावणी .
               २)सम-न्यायी पाण्याचे वाटप                                  

सुभाष गायकवाड -
·  फाळणी-१९४७.केवळ धर्मात म्हणून रक्तरंजित.-म्हणून लक्षात.१९९१-गत्त्स तेव्हाही देशाची फाळणी-श्रीमंत आणि गरीब यांच्यात-रक्तरंजित  नव्हती- म्हणूण लक्षात नाही.                                     ९१ नंतर श्रीमंतांच्या षडयंत्राला सुरुवात.               
·   गरीब इंडिया वरील आक्रमण  डॉ.अर्जुनसेन गुप्ता -८४ कोटी समुदाय-सामाजिक-राजकीयदृष्ट्या वंचित यांना चेहरा कसा प्राप्त करून देता येईल.असा आपला प्रयत्न असला पाहिजे.                
·  आपण आपल्या पातळ्यांवर प्रयंत्न-उल्काताई रायगडमध्ये                              
·  दिवसेंदिवस कामगारांची संख्या कमी.त्यामुळे आपली शक्ती कमी पडतेय.                    
·   माझा प्रश्न आपला "जनाधार" काय?       ९३%असंघटीत क्षेत्र.                            
·  अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायद्याला पाठबळ कसं उभ करता येईल - १)बुवांचे आर्थिक उत्पादन उदा.१ रुपयाचे गोमुत्र १०० रुपयांना,  किलो शेण १००० रुपयांना. २)आर.एस.एस. मंदिर वही बनायेंगे.                                       आज आणि उड्या हा प्रश्न संपणार नाही.निरंतर चालणारा आहे.                          
·  जनरेशन (पीढी) पुन्हा घडवायचे असेल तर-
आपला जनाधार---आपल्या विचारांची संख्या वाढण्यासाठी शाळांमध्ये जाऊन,,गोष्टीची छोटी छोटी पुस्तके काढून द्यावीत.महानगरपालिकेच्या शाळांपासून ते ...शाळांपर्यंत                 
·  जनाधार काबीज करण्यासाठी विविध उपक्रम/प्रयोग                    
·  अंतर (Generation Gap)   कसं कापता येईल.     
·  राजकारणात हस्क्षेप करण्याचा प्रयत्न -एकही आपला उमेदवार उभा नाही.हे प्रयोग सातत्याने होण्याच गरजेचं.आम्ही २१ उमेदवार उभे केले होते---२००१-२०११-एकदाही असा प्रयोग नाही.
·  जागतिकीकरण विरोधी कृती समिती आपण स्थापन केली.पण प्रत्येक बैठकीला उपस्थित राहतो का?  आपली शक्ती आपण कमी करतो.               
·  केंद्रसरकारने  एखादी योजना काढली तर लगेच त्याच्या विरोधात जायचं.दुसरी आली की लागेश दुसरीच्या पाठी.अशी आपण आपली शक्ती वाया घालवतो.                                                     

श्री मंगल धारवाडकर-    प्रबोधनाच काम मी शाळेमध्ये करत आहे.पुढेही करेल.   

संजीव चांदोरकर-             मुद्दे मांडताना ज्यावर आपली एकजूट त्यावर वेळ वाया घालवू नये.मतभेद-त्या गोष्टी मांडाव्यात.                                            

 अभय-
·  लोकांमध्ये वावरत असताना वैचारिक मतभेद घेऊन कार्य.---पण लोकं याबद्दल काय विचार करतात हे महत्वाचं-लोकांना आपले कंगोरे माहीत नाही.'डावे म्हणजे डावे'   असा लोकांचा दृष्टीकोन.                      
·  गेल्या अनेक वर्षापासून-परिवर्तन वाद्यांची आणि डाव्यांची एकजूट ही पक्षाची गरज नसून लोकांची गरज .                            
·  लोकांचे प्रश्न घेऊन त्यात सातत्य ठेवण गरजेचं.                         
·  माझा विभाग -विद्यार्थी विभाग.                                             
             विद्यार्थी चळवळीत येत नाहीत .उदा.आताची घटना-लेख-औरंगाबादमध्ये जवळ जवळ सगळ्या पक्षांचे मोर्चे ---त्यात असं की आंदोलन होतायेत---प्रतिनिधी आंदोलन करतायेत --पण ज्यांच्यासाठी हे आंदोलन ती जनता मूक.ती            आंदोलनात सहभागी नाही.                                  
·   आण्णांचे आंदोलन -लोकांची चीड.                        
·  पण लोकं शोध घेत आहेत पर्यायी नेतृत्वाचा .म्हणून एकजुटीबाबत आपण कार्यक्रम आखावा असं वाटत.                          
·  अमेरिकेत काही बोगस विद्यापीठे सापडली.शिक्षणाच्या कायद्याचे(Right To Education )  फायदे सरकारला सांगता येत नाही.   
·  सरकारी शाळा,सरकारी महाविद्यालये वाचली पाहिजेत.                                   
·  विद्यार्थ्यांचा  विचार या बैठकीत झाला पाहिजे.                                  

 दीपक कसाळे-                                                      
·  मला हे मान्य आहे की,संवादाची समस्या समग्रतेच पाहिली पाहिजे.                         
·   डाव्या पक्षांचे आपापसातील व इतरांशी मतभेद-मागचा फुले आंबेडकर विचार घेवुन काम करणारे नवे कार्यकर्ते.बनसोडे सरांची गोष्ट-नको त्यांच्याशी युती.याचा बारकाईने विचार होण्याची गरज.आपण अनौपचारिक चर्चा--चांगली तितकी अशा मिटींगमध्ये होत नाही.  
·  आपल्याकडे "Dialogue Culture "  होत नाही.                                                                   
·  आधी राजकीय की सामाजिक-सांस्कृतिक                
·  प्रतिक्रियेच्या चौकटीत जी सामाजिक-सांस्कृतिक आंदोलने झाली.  स्व बदलाकडे जास्त लक्ष दिल.                                                                                                                   
·  बाहेरच्या शक्तींकडे जास्त लक्ष दिल पाहिजे.व्यवस्थेला हात घालणाऱ्या मुद्द्यांकडे लक्ष .  
·  आपण जो अनुभव व्यवहारात घेतोय.एकच मत,प्रश्न इत्यादी.पण परिस्थितीमुळे दोन टोकाच्या भूमिका.                                             
·  ही  स्व-बदलाची प्रक्रिया(D -Class ,D -Gender) ही मांडली पाहिजे.
·  सत्तेच डायनिस्म (Dynism)
·  जस  पर्यायी विकासाचं मोडेल ,तसच  पर्यायी सत्तेच  मोडेल समजुन घेतलं पाहिजे. 
·  १.आदर्श कल्पना 
          २. मानवीय पातळीवरचा व्यवहार-यांच्यात अंतर्विरोध आहे.

बुद्धाप्रिय  कबीर :-
·  आपण(डावे)  प्रस्थापितांच्या तुलनेत कमी पडलोय.
·  आपण (डावे) प्रस्थापितांच्या तुलनेत आपली राजकीय उपद्रव मूल्यात उभारणे.
·  सत्ता ताब्यात घेण महत्वाचं आहे.त्याचा उपयोग करायचा हे आपल्या तत्वांनुसार करू-
 कॉ .कानगो -    आपण ज्यांच्यासाठी काम करतो त्याचे मतदानात रुपांतर करायला आपण कमी पडलो.

कॉ.भीमराव -
·  औरंगाबाद्चे वैशिष्ट्य मतभेद (दीपक कसले,नीर,मला राणे,.....) बाजूला ठेऊन कामासाठी एकत्र असतात.
·  आमच्याबरोबरची तुमची(तरूण) पीढी आमच्याबरोबर आले नाहीत.
उल्का म.-

१.विचारवेध पुन्हा सुरु करावा हा हेतू नाही.चर्चा व्हायला पाहिजे,पण ती जबाबदारी घेवुन आम्ही निघालो नाही.
२. "राजकीय " असा रोख ठेवूनच.
३.राजकीय एकजूट नाहीच असं नाही.पण अलीकडच्या ल्कालात असं दिसतंय-'हात राखून चाललंय'.त्याचं कारण त्याचा फाटाफुटीचा  इतिहास. पण त्याला पाठी टाकून नव्या जोमाने एकत्र येणे.उदा.सर्व कामगार एकत्र येऊनही शिवाजी पार्क भरत नाही.
४.मोठ्या सभांमध्ये अशी चर्चा होत नाही.....................
५.आपल्या प्रत्येकाला पूर्वासमीचं ओझ.उदा.ताई स्वतः..-.......,ढोबळे-एनएपीएम,जागतिकीकरण विरोधी कृती समिती .........................
 आपण कोणाचं प्रतिनिधित्व करता.
६.एनजीओ म्हणजे काय?-१.जे राजकारणात नाही ते  एनजीओ .२.फोरेन फंडिंग,कृती कार्यक्रम...........अशी चौकट,ती एनजीओ.
   जर आपण राजकीय.  ........  नसलेल्या शेतकरी संघटना इ. ना एनजीओ म्हणत असू आणि आपल्यातून वेगळे करत असू तर ती मोठी चूक.
एकीकडे  उजवे हजारो तोंडाने पुढे आर.एस.एस. आणि आपण ...हे नाही म्हणून  एकेकाला बाजूला काढत असू तर काय?
विचारांच्या कसोटीवर आपले कोण हे नव्याने पारख .सर्वोदय,गांधीवादी,...इ.
७.जेव्हा आपण राजकारण म्हणतोय तेव्हा आपण फक्त निवडणूकांमधले  नाही.सातेला हात घालणारे सगळे डाव इ. राजकारण.

·  काम करतानाच्या अडचणी-
     - सेझ-अनेक पक्ष पाठींबा,डावे इ.   तेच पक्ष शिवसेनेशी युती. 'शेकाप-शिवसेना-राष्ट्रवादी इ.युती' मत कसं देणार.       सगळे विरोधी काँग्रेस तेव्हा कोणाची बाजू?    स्थानिक शेतकऱ्यांनी कसे ठरवायचं आपलं कोण?    मग सर्वसामान्य                                                                         लोकं तुम्हाला तुकड्यांत  बघतात.निवडणुकीसाठी-हा पक्ष आणि सेझसाठी(विरोधासाठी)-हा पक्ष.  सेझविरोधी लढाईला राजकीय टोक आंतच येत नाही.         
       - Intigrity च आज धोक्यात.

कॉ.कानगो -  "समाजाला अराजकीय निर्णय घ्यायला भाग पाडणे " हा कळीचा मुद्दा.

चांदोरकर
·  .या बैठकीचे सर्वांनी स्वागत केल ,पण त्याची गरजही सांगितली.बोलण 'विद्यार्थी' राहील  (उदा.भरावे,करावे)असं बोलू नये.
·  विषयाला अधिक टोक आणण्यासाठी पुढील चर्चा असावी.
·  आपल्या  मनातील एकजूट-'राजकीय' असणार आहे.
·  'संघटनात्मक एकतेसाठी लागणारी वैचारिक एकता'  असं घाद्वान,याच महत्व सगळ्यांना पण -
              १)'ही प्रक्रिया काय असेल?' या मुद्द्यावर भाष्य करावे.  "Does And Donts" 
              २)ही आयडिया(Idea) ऑपरेशानलायीस्ड (Operationalised)कशी करावी.
                 उदा. विचारवेध पुन्हा करावं का?,महाराष्ट्र फोकस्ड ठेवून पुढील किमान कार्यक्रम.या बैठका पुढे कशा घ्याव्यात,त्या संदर्भात पुढाकार कोण घेईल?  

 कॉ.कानगो
·  आतापर्यंतचा इतिहास धर्माधिकारी इ.---"issue based unity" लवकर झाली---यापेक्षा वैचारिक चौकट करून मग   काम हे किलष्ट.
·  संघटनांकडे अशी यंत्रणा नाही की -'माहिती(information)' मिळवेल.उदा.कंत्राटी कामगारांची संख्या प्रत्येकजण आपापल्या मर्जीने सांगतो. 'महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची स्थिती' असे ठराविक विषय घेऊन अभ्यास(information)
·  १ . issue based programme आणि २.चळवळींची गरज यांना बरोबर घेऊन  कसं जाता येईल.

चांदोरकर- 
फक्त वैचारिक मतभेद नाही ,तर बौद्धिक व भावनिक मतभेद consolidate कसे करता येईल.?

कॉ.कानगो.-
·  गिरणी कामगार
·  अस्मितेचे मुद्दे लोकांना जास्त भावतात आणि राजकीय नेते त्याचा फायदा उठवतात.
·  आर्थिक  प्रश्न   जास्त  टोकदार  असतात .
·  आमचा पक्ष (CPI) तयार आहे.जस आपण या बैठकिच पत्रक काढलं,तसं पत्रक काढू.
·  निवडणूक हा प्लाटफॉर्म नाही.पण मुद्दे ठरवून संघर्ष केला तर व्यापक एकजूट होईल.
·  sustain struggle करणारा प्लाटफॉर्म उभा करावा.

कॉ.भिमरावांचा चांदोरकरांना प्रश्न(overlapping च्या मुद्द्यावर )-
·  वैचारिक एकता-  आपल्यात मतभेद आहेत.पण बरेचसे मुद्दे/भाग ओवेर्लाप्पिंग आहेत.म्हणून तर आपण इथे आली.ते consolidate करता येईल का?असा आपला प्रयत्न.नाहीतर आपण मांडीला मांडी लावून बसलो नसतो.

कॉ.भीमराव-
·  आपापल्या  ब्यानरच्यापाठी एक विचारसरणी आहे.कॉमन गोष्ट-डावे,परिवर्तनवादी.ते एकत्र होतील अशी शक्यता अजिबात नाही.
·  १० ऑक्टो .२००२-रोजगार हमी योजना (घटना सांगितली ).....................................................
·  लोकांनाही त्यःची तीव्रता किती जाणवते, यावरही अवलंबून आहे.

४.३२
·  पुढे  जे लढे तीव्र तयार होतील.ते शेतकऱ्यांचे लढे,भू-संपादन.त्या दृष्टीने आपण आताच तयारी.
           कारण राज्यकर्त्यांना जमिनीचीच अधिक  गरज.
·  वैचारिक एकता अवघड पण issue based कार्यक्रम 
·  इतिहास-निवडणुकांच्या  वेळी आपले काही  प्लाटफॉर्म विस्कळीत.

उल्काताई-
१.रोजगार हमीचा कायदा अजून चांगला बनवलाय.-सोनियांच्या इंटरेस्ट ने.
२.पक्षांनी/सरकारने/डाव्यांनी संघटनांना बोलावून राष्ट्रीय मिटिंग.
३.'Information ' (कॉ.कानगोंनी मांडलेला मुद्दा ) आमच्या डोळ्यासमोर काही मुलं,जी हे करू शकतील.त्यांना एक 'सेन्टर' उभं करणं गरजेचं.
४ .'शेतकऱ्यांच्या आत्महत्ये'बाबत आपले आपले चार कार्यकर्ते पाठवून संघटना.एवढा तीव्र प्रश्न असून आपला एकाही डावा नेता/कार्यकर्ता तिथे नाही.

कॉ .कानगो-
·  यासोबत शिक्षण आणि आरोग्य
उदा, औरंगाबाद महानगरपालिकेचे हॉस्पिटलच नाही.
·  चांदोरकरांचा  प्रश्न-काळजी घेतली पाहिजे- म्हणजे काय?
कॉ.भीमराव-
·  इलेक्शन च्या आपल्या समितीत फुट पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
·  राजकारण   केलं पाहिजे आणि साध्य निवडणुकीतच राजकारण  होऊ शकत.

कॉ .कानगो
·  एकत्र लढणारे लोकं इलेक्शन मध्ये एकत्र असतीलच असे नाही.काही जागा एकत्र लढतील.हे जर-तर.
·   लोकांना काय वाटत हेही महत्वाच.उदा.१९९५ ला आम्ही व्याजदर कमी मिळाले,असं आम्ही. आमच्यावर अग्रलेखही लिहिले,कोणत्या जगात वावरतात असे प्रश्न विचारले. 
·  डायरेक्ट राजकारणाशिवाय हस्तक्षेपाच्या जागा आहेत.त्यातून आपण आपली ताकद वाढवू शकतो.

शांताराम-
·  मी खूप आशावादी माणूस आहे.
·  आघाड्या या केवळ प्रश्नाभोवती.
·  जे केल्याशिवाय परिवर्तनाला पर्याय नाही.तो मार्ग सोडून सरळ मार्ग निवडणे.
·  लढे होतात त्या प्रश्नाचं राजकीय रुपांतर हत नाही.ते राजकारण फक्त निवडणुकीच नाही.
·  १.भावी काळात राजकीय सत्ता ताब्यात घेण          २.त्यासाठी प्रभावी राजकीय व्यासपीठ उभं करणे -हे चार-पाच आंदोलनांच्या अभ्यासावरून.
·  महाराष्ट्रात १०० वर्षांपर्यंत फुले- आंबेडकर ,समाजवादी ....इ. सत्तेवर येणार नाही.
·  इनफोर्मेशन टेक्नोलॉजी वाढूनही काही माहिती मिळत नाही,देत नाहीत.Where is Global Village?.उदा. बाजूच्या तालुक्यातील एखादी  गोष्टीची माहिती अधिकार देत नाही.
·  राजकीय पुढाकार घेण्यात "झकमारी" कोणालातरी करावी लागते.
·  पडद्यामागे राहुन जैविक समानता तयार करणे.
·  "सिमेंटींग फोर्स "चा कुणीतरी विचार केला पाहिजे.
·  २० वर्षे,२८८ मतदार संघांचा ३ वेळा दौरा केल्यावर माझा अनुभव-२० वर्षे राजकारणावर काम केलं तर सत्ता बदलेलच.महाराष्ट्राची जनता  त्याची वाट पाहतेय.मनसेला उगाच पाठींबा नाही मिळत!
·  राजकीय अतृप्त शक्तींना आशा.
          १.इथल्या कष्टकरी,शोषिक,दलिताने जव उपक्रम केले,त्याची फारशी चिकित्सा केली जात नाही,मारली जाते.उदा.संयुक्त महाराष्ट्र चळवळ.
           २.जमिनी वाटल्यानंतर-'नव-शेतकरी समूह'
·  आपण फक्त शोध घेतो.काय प्रश्न?पण त्यातून काम करताना कोणकोणती ताकद उभी राहते याचे निरीक्षण करू.
·  राब-राब राबण्याचे  बळी आपण होणार का
             चिकित्सा करावी लागणार आहे.उदा.शरद जोशी.२४,२०० कोटी गायरान जमिनी नावावर त्याच्झी दाखलाच कोणी घेतली नाही.
              इथ येत राजकीय,भाषिक आणि आपल्या अभ्यासाच्या मर्यादा.
·  महत्वाचे राजकीय टप्पे निश्चित करावे .त्याचा अभ्यास करावा.
·  ग्लोबलाइस्ड मिडियाने सगळ कप्पेबंद केलं आहे 
·  राजकीय ताकद-"संकल्प करण्याची गरज" जो येईल त्याला घेऊन पुढे जायचं.
·  एनजीओ,वित्तीय भांडवलशाही या जुन्या शब्दांत अडकू नये.तो  जागतिक फिनोमीना आहे.
·  जगण्याची शक्ती,पावलं असली पाहिजे.टाचणी लावण्याचे काम नको.
             १.विचारसरणी (Ideology )
             2.Critical Mass-फुले  आंबेडकर  ......... .
             3.त्याचे कार्यक्रम
             ४.त्याचे संघटन
             ५.त्याचे नेतृत्त्व

चांदोरकर-
               प्रश्न-राजकीय संकल्प पाहिजे-हा प्ल्या'A ' आणि हा जर जवळच्या काळात शक्य नाही तर प्ल्या 'B' जो issue based संघर्ष हा आहे का?
शांताराम -  माझा B ला विरोध नाही
उल्काताई -  त्याचं (B चं ) पुढच टोक गाठलं पाहिजे.
शांताराम   -उल्काच्या कामात राजकीय पक्ष नाही.त्याचं पुढ/ पलीकड पाहिजे. 

चांदोरकर-भीमरावांना -  औरंगाबादचे वैशिष्ट्य?करणं माहीत नाही.औरांगाबाद्चे डावे कार्यकर्ते बरेचसे बाहेरचे(औरंगाबादच्या)..

कॉ.भीमराव-      "मित्रत्व असणे" हे औरंगाबादचे वैशिष्ट्य .हे मित्रत्व राजकीय पर्यंत मर्यादित नाही,व्यक्तिगत कौटुंबिक सुद्धा.
उल्काताई  -        -त्यात सीपीएम आहे का?
कॉ.भीमराव-         त्यातले काही लोक आहेत.
चांदोरकर-           मुंबईसारख्या शहरात औरंगाबाद मॉडेल याबाबत काय तुमचं काय मत?
कॉ.भीमराव-          उदा. मी लाल निशाण पक्ष,सीपीआय चे लोकं टाकसाळ इ.पण आमचे वैयक्तिक व कौटुंबिक संबंध चांगले.तसे शांताराम -.......,समाजवादी-सुभाष लोमटे,विष्णू-लोहियावादी,पण तरीही आमचे चांगले संबंध.दुरावा                                         नव्हता.आमच्याशी  तुलना करता 'पुणे' बघा.उदा-किशोर ढमाले-र.....,
चांदोरकर(विनोदपूर्वक)- मी हेतुपूर्वक (परपोजफुली) पुण्याच नाव नाही घेतलं.(हशा)
                        तुमच्या औरंगाबादच्या पाण्याच केमिकल तपासणी केली पाहिजे.  (हशा)
कॉ.भीमराव- उदा.पोलीसांच काम इ. बाबत ते (औरंगाबादमधील इतर पक्षाचे आणि बैठकीला उपस्थीत असणाऱ्यांना उद्देशून कार्यकर्ते  ) आम्हाला मदत ,..................या बाबतीत आम्ही त्यांना मदत.

विष्णू-    माफी मागत..
उल्काताई(विनोदाने).- म्हणजे नंतर ठोकायचे.(हशा)
विष्णू - इतकी गंभीर चर्चा याची मला कल्पना नव्हती.काही विषय अधिक गंभीर पण त्याची चर्चा लाइटली होते.
·  स्त्रेनथन(मजबूत)  करण्याची भूमिका -विचारवेध,आण्णा भाऊ साठे....इ.
·  जैविक  राजकीय नाते - ही नाजूक व गंभीर चर्चा होऊ शकते.
·  महाराष्ट्रातल्या आताच्या वातावरणात आपली चर्चा पुढे घेऊन जायची असेल...
·  दिडशे ते दोनशे  वर्षाची मॉडर्न महाराष्ट्राची आपल्याला परंपरा.
·  नवीन    प्रयोग (संस्कृती,....,....,इ.)हे महाराष्ट्राच्या भूमीत झाले.
·  ज्वारीच पोत सोडव इतके मुद्दे बाहेर निघतात.इतके पॉझीटिव्ह मुद्दे.या केमिस्ट्रीचे आपण देयक नाहीत.इतिहास त्याचा देयक आहे.हे संत परंपरेत,समाजक्रांतीत,.....
·  "महाराष्ट्र या देशातील प्रयोगशाळा"    उदा. तेलंगणा,मराठवाडा.
·  जमिनीच्या प्रश्नावर एवढा(६०-६७ दादासाहेब ..) संघर्ष कधीही  झाला नव्हता.
·  कमीत कमी काहींकडे डेव्हलपमेंटमधून चांगली घरे आली.
·  कधी इंग्रज,कधी मुस्लिम...............
·  महाराष्ट्रातील इश्युज आयडेंटीफाइड करा.
             मी -"चंद्रपूर--विदर्भ--मराठवाडा-प.महाराष्ट्र--कोकण--राज्यपाल कमिटी "= शेतकऱ्यांच्या आत्महत्या.
·  परिस्थितीच रीडिंग कसं करतो/करावं,तो कार्यकर्ता पुढे जाईल.
·  लोकांचे प्रश्न समजा तेही तुमच्याबरोबर येतील.
·  महाराष्ट्र-आपण जे सरकारला सांगतो.  ही परिस्थिती इतर कोणत्याही राज्यात नाही.
·  शेतीचे  सर्वात जास्त प्रश्न महाराष्ट्रात.
·   शेतकऱ्यांचीच पोर अधिकारी,तहसीलदार,पोलीस इ.इतकी भक्कम व्यवस्था
           महात्मा फुले-"शेतकऱ्यांची अर्ध शिकलेली पोर नोकरीला लागतील.आपली दुख त्यांना सांगत नाही-नोकरी जाईल म्हणून."
·  महारास्त्रातील पॉलिटिकल ब्यानरचा  चा अभ्यास /इव्याल्युएशन नका करू.त्यांचे   ब्यानर आहेत.त्यापेक्षा प्रश्न आयडेंटीफाइड करा.
·  नव्या आघाड्यांना जन्म द्यायला भीती वाटते.
             आपली जागतिकीकरण विरोधी कृती समिती आहे ना!  ती मोठी करा.
·  आपण प्रश्न  आयडेंटीफाइड करतो.आपण समाज सेवकाचच काम करायचं का?
·  एनजीओ वार माझा ठपका का-कारण मी स्टेट मानतो.
·  भारतीय शासन संस्थेला "मजबूत" करायचं,की "रिप्रेस" करायचं?त्यामुळे सामाजिक परिवर्तन होईल का?
·  भारतीय संविधान बनत होते तेव्हा आर.एस.एस.,भांडवलशाही इ. ने विरोध केला .मग उरलं कोण-काँग्रेस व फुले-आंबेडकर.लिहिलं त्याने संविधान.
·  संघटीत राजकारणाच श्रेय  त्यांच्या पुढाऱ्यांपेक्षा भारतीय संविधानाला अधिक जात.
·  हे सगळ ढासाळायला लागलं,तेव्हा आपण म्हणतो 'संघटित टिकल पाहिजे'
·  आंबेडकर आपल्या पुढे होते.(९०% कायद्याच्या .... म्हणून )
·  १.vaccum भरला पाहिजे- प्रश्न आयडेंटीफाइड करून.  
          २.नावे ब्यानर तयार करू नका 
·  केंद्रसरकार जो नवीन थेसिस मांडताय-जाती-लोकसंख्या मोजणी.
·  डाव राजकारण सामाजिक विषमतेला ड्रेस करू शकलं नाही तर...?
·  तीस वर्षे समाजवादी राजकारणात घातले पण चर्चा पुढे जात नाही.
·   
...