Monday 24 December 2012

प्रकट चिंतनः दिल्‍लीतील बलात्‍काराच्‍या क्रौर्याची परिसीमा गाठणा-या घटनेविषयी


  • या घटनेने अख्‍खा देश हादरला आहेमीही हादरलो आहे.

  • गुन्‍हेगारांना तातडीने व अत्‍यंत कडक शासन व्‍हायला हवे असे मलाही वाटतेतथापि,काहीजण फाशी तर काही जण castration (पुरुषाचे वृषण काढून त्‍याला नपुंसक बनविणेअशा शिक्षांची मागणी करत आहेतत्‍यांविषयी मात्र मनात किंतु आहेत.विचार करतो आहेपण या शिक्षांच्‍या बाजूने मन अजून तयार होत नाहीफास्‍ट ट्रॅक कोर्टात रोज सुनावणी होऊन आताच्‍या कायद्यातील कठोरात कठोर शिक्षा तातडीने व्‍हायला हवीएवढे मात्र निश्चित वाटते.

  • आपली अंतर्गत सुरक्षाकायदा-सुव्‍यवस्‍था संभाव्‍य गुन्‍हेगारांना जबर धाक वाटावी,अशी नाहीही वस्‍तुस्थिती आहेयादृष्‍टीने पोलिस यंत्रणेत आवश्‍यक त्‍या सुधारणा तातडीने होणे गरजेचे आहेत्‍याविषयी अनेक सूचना येऊ लागल्‍या आहेतत्‍यांचा गांभीर्याने विचार व्‍हायला हवा.

  • एक लक्षात घ्‍यायला हवे असे वाटतेअशा सुधारणा करुन पोलिस यंत्रणा कितीही परिणामकारक केलीतरी त्‍यास मर्यादा राहणारचअशा गुन्‍ह्यांबाबत नागरिकांनी सजग राहूनवेळेवर हस्‍तक्षेप करणेही गरजेचे आहेदादरला पत्‍नी समजून ज्‍याने दुस-याच मुलीवर कोयत्‍याने वार केलेत्‍याला लोकांनी तिथल्‍या तिथे पकडून पोलिसांच्‍या स्‍वाधीन केलेहे यादृष्‍टीने खूप आश्‍वासक आहे.

  • दिल्‍लीच्‍या या घटनेबाबत ज्‍या प्रतिक्रिया व्‍यक्‍त झाल्‍यात्‍यात बॉलिवूडमधील अनेकांनी कठोर शिक्षांची मागणी केली आहेतथापित्‍यांच्‍यापैकीच एकअनुराग कश्‍यप यांनी आपल्‍या बिरादरीला आत्‍मचिंतन करायला लावले आहेत्‍यांनी स्‍त्रीकडे भोगवस्‍तू म्‍हणूनच पाहायला शिकवणा-या 'तू चिज बडी है मस्‍त मस्‍तसारख्‍या'आयटम सॉंगकडे लक्ष वेधले आहेमला हे खूप महत्‍वाचे वाटतेगणपतीआंबेडकर जयंती इअनेक सार्वजनिक उत्‍सवांच्‍या वेळीअगदी शाळा-कॉलेजांतील गॅदरिंगला,टीव्‍हीवरच्‍या नृत्‍यस्‍पर्धांवेळी या प्रकारच्‍या गाण्‍यांना खास मागणी आपल्‍याकडूनच असतेआपल्‍या मुलींना-अगदी न कळत्‍या मुलींनाही आपण हीच गाणी शिकवून नाचायला लावतोत्‍यांना लोकांनी शिट्याटाळया वाजवल्‍या की आपण पालक कृतार्थ होत असतोमुलींच्‍या 'वस्‍तूकरणातआपण हा जो क्रियाशील सहभाग घेत असतो,त्‍याचे काय करायचे ?

  • मुंबईसारख्‍या शहरांत नवरात्रातले टिप-यांच्‍या तालावर चढत जाणारे दांडिया नृत्‍य आता मोकळ्या मैदानावर दिसणे बंद झाले आहेआधी गणपती पडद्यात बंद झाले आणि नंतर दांडियागणपतीचे बाहेरुन दर्शन आता घेता येत नाहीतथापिरांग लावून बिनपैश्‍याने त्‍यास अजूनही बघता येतेदांडियाला मात्र ब-यापैकी पैसे मोजल्‍याशिवाय जाता येत नाहीया दांडियात आता निखळ मूळ गुजराती लोकसंगीत नसतेत्‍याचे बॉलिवूडी गाण्‍यांशी फ्यूजन केले जातेही गाणी 'तू चिज...' सारखीच असतातहल्‍ली नवरात्रानंतर अविवाहित तरुण मुलींच्‍या गर्भपाताच्‍या घटना वाढल्‍याचे वृत्‍तांत आहेत.

  • आपल्‍या गणपतीनवरात्रदहीहंडीहोळीसारख्‍या सणांचे हे बाजारीकरण आम्‍ही मुकाटपणे नव्‍हेसहर्ष स्‍वीकारले यास जबाबदार कोण ?

  • सध्‍याच्‍या आर्थिक व्‍यवस्‍थेने भौतिक विकास नक्‍की साधला आहेपण तो आजही विषम व असंतुलित आहेत्‍यागाचीसाधेपणाची महती गाणारा पूर्वीचा मध्‍यमवर्ग आज विलक्षण गतीने अर्थसंपन्‍न झाला आहेगरजेपेक्षाही प्रतिष्‍ठेसाठी तो गाड्या,मोबाईल बदलतोराहण्‍यापेक्षाही गुंतवणूक म्‍हणून घरे घेतोप्रसंगी भाड्याने न देता रिकामी ठेवतोसोसायटीत राहणा-यांची ही सुबत्‍ता आणि त्‍या सोसायटीची रखवाली करणा-या सिक्‍युरिटी गार्डला जेमतेम ते हजार रुपये महिन्‍याचा पगार.सोसायटीतल्‍यांची साधनसंपदा तो रोज बघत असतोअर्ध्‍याअधु-या तंग कपड्यातल्‍या मुली-बाया त्‍याच्‍या समोरुन सतत जात येत असतातया स्थितीत त्‍याच्‍या मनात काय चालत असेल त्‍याचे गावतिथली गरिबीतिथल्‍या मुलीतिथली वंचना आणि इथे...? - अशा या विषमतेचे काय करायचे वॉचमनट्रक-शाळा-कंपन्‍यांचे ड्रायव्‍हर-क्लिनरसफाई कामगार असलेल्‍या या मंडळींनी अशा विषमतेत मन मात्र'सं‍तुलितठेवायचे अशी अपेक्षा बहुधा आपण करतो आहोत.

  • मध्‍यम-उच्‍च मध्‍यमवर्गातले तरी 'संतुलितमनाचे आहेत का नाहीतराहू शकत नाहीतस्‍पर्धेच्‍याप्रतिष्‍ठेच्‍याप्रगतीच्‍यासुखाच्‍यामनोरंजनाच्‍या 'चकव्‍यामापदंडांचे तेही बळी आहेत.

  • म्‍हणूनचविषमतेच्‍या या सर्व थरांत विकृती जन्‍मास येतातत्‍या गुन्‍ह्यांना जन्‍म देतात.

  • ज्‍या सुविधा आपल्‍याला आहेतत्‍या सर्व समाजाला मिळायला हव्‍यातयासाठी मी प्रयत्‍न करायला हवाजो सन्‍मानसामाजिक स्‍थान मला आहेते प्रत्‍येक व्‍यक्‍तीला मिळायला हवे यासाठी माझी खटपट राहीलसत्‍ता-प्रतिष्‍ठा-पैसा या मागे दमछाक होईपर्यंत धावण्‍याला लगाम घालून मोकळ्या आकाशाकडेअथांग समुद्राकडे पाहण्‍यास,माणसांत रमण्‍यास वेळ काढेनकातडीपेक्षा मनाच्‍या सौंदर्याचा वेध घेईनवाद्यांच्‍या कर्कश्‍य गोंगाटाऐवजी संगीताचा मधूर सूर ओळखायला लागेन. रंगांच्‍या-आकारांच्‍या-कसरतींच्‍या चमत्‍कृतींतील निरर्थकता समजून घेऊन ख-या कलेचा आस्‍वाद घेईन.

  • ...आजच्‍या विकृतींनापर्यायाने गुन्‍ह्यांना उतार मिळण्‍याचा हा सरळ साधा मार्ग आहे.

    सुरेश सावंत
    20 डिसेंबर 12

1 comment:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete